सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC), बेंगलोर (मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भारत सरकार यांची एक सायंटिफिक सोसायटी) मध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनीअर करार पद्धतीने ३ वर्षांच्या कालावधीसाठी भरती. एकूण रिक्त पदे – १२६. रिक्त पदांचा तपशिल कंसात संबंधित डोमेन नमूद केले आहे. (१) प्रोजेक्ट इंजिनीअर (PE) एआय लायब्ररी अँड फ्रेमवर्क डेव्हलपमेंट (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI/ML) – ५.
(२) PE – बॅकएंड इंजिनीअर (आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फॉरमेशन सिक्युरिटी, आयटी ऑपरेशन्स इ.) – ३.

(३) PE – कंपायलर अँड पॅरलर प्रोग्रॅमिंग लँग्वेज (HPC सॉफ्टवेअर/HPC प्रोसेसर डेव्लपमेंट/कॉम्प्युटर सायन्स इ.) – ७.
(४) PE – एम्बेडड हार्डवेअर डिझाईन इंजिनीअर (IoT, एम्बेडेड सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर अँड एम्बेडेड सिस्टीम) – ८.

(५) PE – एम्बेडेड फर्मवेअर डेव्हलपमेंट (एम्बेडेड सिस्टीम्स) – ८.
(६) PE – आयटी इन्फ्रास्टक्चर (क्लाऊड अँड नेटवर्क सिक्युरिटी, कॉम्प्युटर नेटवर्क, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन इ.) – २.

(७) PE – मेकॅट्रॉनिक्स/रोबोटिक्स इंजिनीअरिंग/मेकॅनिकल (डिझाईन, मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स) – १.
(८) PE – MPI, मॅथ लायब्ररी अँड कम्युनिकेशन लायब्ररिज (कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन सायन्स अँड इंजिनीअरिंग) – ७.

(९) PE – क्वांटम कॉम्प्युटींग (क्वांटम टेक्नॉलॉजी) – १३.
(१०) PE – VLSI-FPGA/ASIC (इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर अँड एम्बेडेड सिस्टीम, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स इ.) – १५.

पद क्र. १ ते १० साठी पात्रता – (i) बी.ई.बी.टेक ६० टक्के गुण, (ii) एम.ई./एम.टेक., (iii) एम.एससी./MCA ६० टक्के गुण, (iv) पीएच.डी.
(११) PE – मॅथेमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग- ३ .
पात्रता – एम.एससी./एम.टेक./Ph.D. (मॅथेमॅटिक्स/स्टॅटिस्टिक्स/ॲप्लाईड मॅथेमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग इ.)
पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना नेमणूकीच्या पूर्वी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

पद क्र. १ ते ११ साठी अनुभव – ०-३ वर्षे.
याशिवाय प्रोजेक्ट इंजिनीअर, सिनिअर प्रोजेक्ट इंजिनीअरची ४ वर्षे/९ वर्षे अनुभव आवश्यक असलेली एकूण ५४ पदे. (विस्तृत माहिती CDAC वेबसाईटवर उपलब्ध आहे. )

वयोमर्यादा – ३५ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

एकत्रित वेतन – रु. ४.४९-७.११ लाख प्रतीवर्ष (संबंधित डोमेनच्या अनुभवावर आधारित).
अर्जाचे शुल्क – ०.

निवड पद्धती – गुणवत्ता/अनुभवानुसार उमेदवार इंटरव्ह्यू/निवड प्रक्रियेसाठी (गरज भासल्यास लेखी परीक्षा घेतली जाईल.) शॉर्टलिस्ट केले जातील. लेखी परीक्षा/इंटरव्ह्यूची तारीख ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी blr-careers@cdac.in

ऑनलाइन अर्ज http://www.cdac.in या संकेतस्थळावर दि. २० जून २०२५ पर्यंत करावेत. (वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज करावेत.)