इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) – ११ सहयोगी बँकांमधील ‘स्पेशालिस्ट ऑफिसर्स’ (स्केल-१) च्या २०२६-२७ मधील एकूण १००७ रिक्त पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस घेणार आहे. रिक्त पदांचा तपशील – (१) आयटी ऑफिसर – एकूण २३ पदे.

(ए) इंडियन ओव्हरसिस बँक – एकूण २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९). (बी) पंजाब नॅशनल बँक – एकूण १० पदे (अजा – १५, अज – ७, इमाव – २७, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४१).

(सी) बँक ऑफ महाराष्ट्र – एकूण ८० पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३३) (३ पदे अपंग कॅटेगरी HI – २, OC – १ साठी राखीव).

पात्रता – ( २१ जुलै २०२५ रोजी) बी.ई./बी.टेक्. किंवा एम्.ई./एम्.टेक्. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स/आय्टी /इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली. कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन) किंवा पदवी आणि DOEACC ’B’ लेव्हल परीक्षा उत्तीर्ण.

(२) ॲग्रिकल्चरल फिल्ड ऑफिसर – एकूण ३१० पदे.

(ए) पंजाब नॅशनल बँक – एकूण १५० पदे (अजा – २२, अज – ११, इमाव – ४०, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ६२) (६ पदे अपंग कॅटेगरी HI – १, OC – २, VI – १, ID – २ साठी राखीव).

(बी) इंडियन ओव्हरसिस बँक – एकूण ८० पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३३) (३ पदे अपंग कॅटेगरी OC, VI, HI साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(सी) बँक ऑफ महाराष्ट्र – एकूण ८० पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३३) (अपंग कॅटेगरी HI, OC, ID साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – ॲग्रिकल्चर/हॉर्टिकल्चर/ॲनिमल हजबंडरी/वेटेनिअरी सायन्स/डेअरी सायन्स/फिशरी सायन्स/फूड सायन्स इ. मधील ४ वर्षे कालावधीची पदवी

(३) राजभाषा अधिकारी – एकूण ७८ पदे.

(ए) बँक ऑफ महाराष्ट्र – १० (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

(बी) सेंट्रल बँक ऑफ इंडिया – २० (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९).

(सी) इंडियन ओव्हरसिस बँक – १४ (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).

(डी) पंजाब नॅशनल बँक – १० पदे (अजा – १, अज – , इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

पात्रता – एम्.ए. (हिंदी) (पदवीला इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा.) किंवा एम्.ए. (संस्कृत) (पदवीला हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत.

(४) लॉ ऑफिसर – एकूण ५६ पदे.

(ए) बँक ऑफ इंडिया – १ पद (खुला).

(बी) बँक ऑफ महाराष्ट्र – ३० पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३) (१ पद अपंग कॅटेगरी OC साठी राखीव).

(सी) सेंट्रल बँक ऑफ इंडिया – २५ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद अपंग कॅटेगरी OC साठी राखीव).

पात्रता – कायदा विषयातील पदवी (एल्एल्.बी.) आणि बार काऊन्सिलसोबत अॅडव्होकेट म्हणून नोंदणी.

(५) एचआर पर्सोनेल ऑफिसर – एकूण १० पदे.(ए) बँक ऑफ बरोडा – १ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि २ वर्षं कालावधीची पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी/पदविका (पर्सोनेल मॅनेजमेंट/इंडस्ट्रियल रिलेशन्स/एच्आर् /एच्आर्डी/सोशल वर्क/लेबर लॉ).

(६) मार्केटिंग ऑफिसर – एकूण ३५ पदे.

(ए) पंजाब नॅशनल बँक – ३५० पदे (अजा – ५२, अज – २६, इमाव – ९४, ईडब्ल्यूएस – ३५, खुला – १४३) (१४ पदे अपंग कॅटेगरी HI – ३, OC – ४़, VI – ३, ID – ४ साठी राखीव)).

पात्रता – पदवी आणि २ वर्षं कालावधीची पूर्ण वेळ MMS/MBA (मार्केटिंग) किंवा मार्केटिंग स्पेशलायझेशनसह PGDBA/PGDBM/ PGPM/PGDM.

सर्व पदांसाठी (आयटी ऑफिसर पद वगळता) उमेदवारांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स/लँग्वेजमधील सर्टिफिकेट/डिप्लोमा/डिग्री किंवा शाळा/कॉलेजमध्ये कॉम्प्युटर/आयटी एक विषय अभ्यासलेला असावा.

रिक्त पदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काही सहयोगी बँकांनी रिक्त पदे, आयबीपीएसला कळविली नाहीत.

सर्व पदांसाठी वयोमर्यादा – ( १ जुलै २०२५ रोजी) २० ते ३० वर्षे (इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे, अपंग – ४०/४३/४५ वर्षे)

निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ) – पूर्व परीक्षा (ऑगस्ट २०२५). १५० प्रश्न, १२५ गुणांसाठी, वेळ २ तास.

मुख्य परीक्षा (नोव्हेंबर २०२५) आणि इंटरव्ह्यू १०० गुणांसाठी डिसेंबर २०२५/जानेवारी २०२६ मध्ये घेतले जातील.

चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

अर्जाचे शुल्क – अजा/अज/अपंग रु. १७५/-, इतरांसाठी रु. ८५०/-.

शंकासमाधानासाठी लॉगइन करा http://cgrs.ibps.in/

ऑनलाइन अर्ज http://www.ibps.in या संकेतस्थळावर २१ जुलै २०२५ पर्यंत करावेत.