OIL Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. ऑईल इंडियातर्फे विविध पदांची भरती करण्यात येत आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, ही भरती ग्रेड ३, ग्रेड ५ आणि ग्रेड ७ पदांवर केली जाईल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते OIL च्या अधिकृत संकेतस्थळ www.oil-india.com वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १८७ पदे भरली जातील. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्त जागांबाबत तपशील

ग्रेड ३: १३४ पदे
ग्रेड ५: ४३ पदे
ग्रेड ७: १० पदे

हेही वाचा : सारस्वत बँकेत १५० पदांसाठी होणार भरती, ८ एप्रिलपर्यंत करा अर्ज

पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणीचा समावेश आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती/जमाती/बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्तींसाठी (जेथे आरक्षण लागू असेल) पात्रता गुण किमान ४०% गुण असतील आणि आणि इतरांसाठी किमान ५० % गुण असतील. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. अंतिम निवड केवळ CBT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने केली जाईल.अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. भरतीशी संबंधित तपशील अधिसूचनेत देण्यात आला आहे.

हेही वाचा : EPFO Recruitment 2023: ईपीएफओद्वारे २८५९ पदांसाठी होणार भरती, १२ वी पास-पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी

अर्ज फी

सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी: GST आणि पेमेंट गेटवे/बँक शुल्काशिवाय ऑनलाइन अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये आकारले जातील. ऑनलाइन अर्ज शुल्क परत परत मिळणार नाही. SC/ST/EWS/बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्ती/माजी सैनिक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil recruitment 2023 apply for 187 grade 3 5 and 7 posts at oil india befor 25 april snk