● पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( PGCIL) (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत एक महारत्न उपक्रम) PGCIL च्या कॉर्पोरेट सेंटर आणि एकूण ११ रिजन्समध्ये एक वर्षाच्या अॅप्रेंटिसशिपसाठी एकूण ८२० पदांची भरती.
महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील PGCIL च्या युनिट्समधील रिक्त पदांचा तपशील –
(१) वेस्टर्न रिजन – I, नागपूर (महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड) – एकूण ११० पदे
(२) वेस्टर्न रिजन – II, वडोदरा (गुजरात, मध्य प्रदेश) – एकूण १४७ पदे
(३) सदर्न रिजन – I, हैद्राबाद (आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक) – एकूण ८६ पदे
(४) सदर्न रिजन – II, बंगलोर (कर्नाटक, तामिळनाडू, केरळ) – एकूण ११६ पदे
ट्रेडनुसार राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील –
(१) ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) – महाराष्ट्र – १५, छत्तीसगड – १४, मध्यप्रदेश ( WR- I – १, WR- II – २१), गोवा – १, गुजरात – १९, आं.प्र. – २, कर्नाटक ( SR- II – १३), तामिळनाडू – १५, केरळ – ४.
(२) ग्रॅज्युएट (सिव्हील) – महाराष्ट्र – ६, छत्तीसगड – ६, मध्यप्रदेश – ( WR- I – १, WR- II – १७), गुजरात – १५, आंध्र प्रदेश – ५, कर्नाटक – ( SR- I – ३, SR- II – ५), तामिळनाडू – २, केरळ – २.
(३) ग्रॅज्युएट (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) – महाराष्ट्र – २, गुजरात – १.
(४) ग्रॅज्युएट इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम – महाराष्ट्र – १, गुजरात – १, तेलंगणा – २, कर्नाटक – ( SR- II – १).
पात्रता – पद क्र. १ ते ४ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिग्री.
(५) एचआर एग्झिक्युटिव्ह – महाराष्ट्र – ६, छत्तीसगड – १, गोवा – १, गुजरात – ५, तेलनंगणा – ३, आंध्र प्रदेश – १, कर्नाटक ( SR- II – ३).
पात्रता – एमबीए (एचआर)/पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ( PM/ PM IR).
(६) डिप्लोमा (सिव्हील) – महाराष्ट्र – ६, छत्तीसगड – ६, मध्य प्रदेश (WR- II – १२), गुजरात – १०,तेलंगणा – ४, आंध्र प्रदेश – ९, तामिळनाडू – २, कर्नाटक ( SR- I – ३, SR- II – ४), केरळ – १.
(७) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) – महाराष्ट्र – १२, छत्तीसगड – १०, मध्यप्रदेश – ( WR – १, WR- II – १५), गुजरात – १२ तेलंगणा – ४, आंध्र प्रदेश – ४, कर्नाटक – ( SR- I – ३, SR- II – ११), तामिळनाडू – १५, केरळ – ५.
पद क्र. ६ व ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(८) सीएसआर एग्झिक्युटिव्ह – महाराष्ट्र – १, गुजरात – २, तेलंगणा – १, कर्नाटक ( SR- II – १).
पात्रता – MSW किंवा रूरल डेव्हलपमेंट/मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्री.
(९) लॉ एक्झिक्युटिव्ह – महाराष्ट्र – १, तेलंगणा – १, कर्नाटक ( SR- II – ५), केरळ – २.
पात्रता – कायदा विषयातील पदवी.
(१०) डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट (सेक्रेटरियल असिस्टंट) महाराष्ट्र – १, तेलंगणा – ४, आंध्र प्रदेश – १.
पात्रता – मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटरियल डिप्लोमा.
(११) आयटीआय (इलेक्ट्रिशियन) – छत्तीसगड – २, गोवा – १, मध्यप्रदेश (WR- I – १, WR- II – २), गुजरात – ७, आंध्र प्रदेश – १२, तेलंगणा – ९, कर्नाटक – (SR- I – ६, SR- II – ७), तामिळनाडू – १५, केरला – ४.
पात्रता – संबंधित ट्रेडमधील आय्टीआय् कोर्स. स्टायपेंड रु. १३,५००/-.
(१२) पीआर असिस्टंट – महाराष्ट्र – १, गुजरात – १, कर्नाटक – ( SR- II – १).
पात्रता – मास कम्युनिकेशन/जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन विषयांतील पदवी.
(१३) बिझनेस डेव्हलपमेंट एग्झिक्युटिव्ह – महाराष्ट्र – १.
पात्रता – एम.बी.ए. किंवा पीजी डिप्लोमा (बिझनेस डेव्हलपमेंट/इंटरनॅशनल बिझनेस/मार्केटिंग).
(१४) राजभाषा असिस्टंट – महाराष्ट्र – १, गुजरात – १, तेलंगणा – १, कर्नाटक ( SR- I – १).
पात्रता – बी.ए. (हिंदी) आणि इंग्रजी भाषेचे कुशल (प्रोफेशनल) ज्ञान.
(१५) लायब्ररी प्रोफेशनल – महाराष्ट्र – १.
पात्रता – बी.एल.आय.एस. पदवी किंवा समतूल्य.
स्टायपेंड दरमहा – पद क्र. १ ते ५, ८, ९, १२ ते १५ रु. १७,५००/-; पद क्र. ६, ७, १० रु. १५,०००/-; पद क्र. ११ रु. १३,५००/-.
उमेदवारांना कंपनी अॅकोमोडेशन न दिल्यास रु. २,५००/- दरमहा अधिकचे दिले जातील.
पात्रता परीक्षा ७ ऑक्टोबर २०२३ ते ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – उमेदवाराला १८ वर्षे पूर्ण झालेली असावीत.
निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची (त्यांना ई-मेलद्वारे सूचित केले जाईल) कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी पद क्र. १, २, ६, ७ वगळता इतर पदांसाठी उमेदवारांनी NAPS वेबसाईट https:// apprenticeshipindia.gov.in आणि Degree/ Diploma Engg. नी NATS वेबसाईट https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर आपले नाव रजिस्टर करावे. रजिस्ट्रेशन/एनरोलमेंट नंबर मिळाल्यानंतर www.powergrid.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करावेत. उमेदवार फक्त एक रिजन निवडून एका पदासाठी (ट्रेडसाठी) अर्ज करू शकतात.