Premium

SBI Fellowship 2023 : तरुणांना मिळणार ग्रामीण भागात काम करण्याची संधी, दरमहा मिळणार १७ हजार रुपये, ३१ मेपूर्वी करा अर्ज

Youth For India Fellowship 2023: युथ फॉर इंडिया फेलोशिप दरम्यान तरुणांना ग्रामीण वातावरणात काम करण्याची संधी मिळणार आहे. ३२ वर्षांपर्यंतचे तरुण या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात.

SBI Fellowship 2023 Last Date to Apply May 31can Get Rs 17000 Per Month Know Who Can Apply
Youth For India Fellowship 2023: युथ फॉर इंडिया फेलोशिप दरम्यान तरुणांना ग्रामीण वातावरणात काम करण्याची संधी मिळणार आहे. ३२ वर्षांपर्यंतचे तरुण या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. ( SBI Youth For india/ Twitter)

Youth For India Fellowship 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्या ११व्या ‘युथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम’साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे २१ ते ३२ वयोगटातील तरुण ३१ मे पर्यंत या फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त, नेपाळचे नागरिक, भूतानचे नागरिक आणि भारतातील परदेशी नागरिक या ११महिन्यांच्या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसबीआय फेलोशिपचे फायदे काय आहेत?

एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिप हा एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. हे तरुणांना ग्रामीण लोकांसोबत राहण्याची आणि काम करण्याची संधी देते. याशिवाय, या फेलोशिपच्या माध्यमातून युवक ग्रामीण विकासातील आव्हाने सोडवण्यासाठी हातभार लावू शकतात.


हेही वाचा – BEL Recruitment 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार होण्याची संधी! लवकर भरा अर्ज; जाणून घ्या किती असेल पगार?

अर्ज कसा करता येईल?

२०२३-२४ च्या बॅचसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात आता अवघे काही दिवस उरले आहेत. अर्ज करू इच्छिणारे तरुण https://you4.in/yfi-org-2023 या लिंकला भेट देऊन नोंदणी आणि ऑनलाइन मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. पहिल्या टप्प्यात, नोंदणीनंतर ऑनलाइन मूल्यांकन केले जाते. या दरम्यान, तुम्हाला फेलोशिप निवडण्याचे कारण आणि इतर अनेक प्रश्न विचारले जातील.

दुसरा टप्पा वैयक्तिक मुलाखतीशी संबंधित आहे. या टप्प्यात एक पॅनेल अर्जदाराची मुलाखत घेईल. ही मुलाखत निवड पॅनेलला शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाव्यतिरिक्त इतर घटकांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी आणि व्यक्तीची सखोल माहिती मिळविण्यासाठी मदत करे.

स्टेज-२ नंतर होईल अंतिम निवड

स्टेज-२ नंतर निवडल्या ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांनी कळवले जाईल आणि कन्फर्मेशननंतर ऑफर लेटर दिले जाईल. त्यामध्ये कार्यक्रमाशी संबंधित तपशील, फेलोशिप समर्थन आणि इतर माहिती असेल.

हेही वाचा – इतरांपेक्षा जास्त पगाराची नोकरी हवी आहे? हे ५ आहेत बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय

फेलोशिप दरम्यान तुम्हाला हे फायदे मिळतील?

  • फेलोशिप दरम्यान, राहण्याचा खर्च म्हणून दरमहा १५००० रुपये दिले जातील.
  • दरमहा १००० रुपये वाहतूक खर्च म्हणून दिले जातील.
  • प्रकल्पाशी संबंधित खर्चासाठी दरमहा १००० रुपयेही दिले जातील.
  • फेलोशिप यशस्वी आणि समाधानकारक पूर्ण केल्यावर ६०,००० रुपये Readjustment Allowanceम्हणून दिला जाईल.
  • तुमच्या घरापासून प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनचे ३AC कोचचे भाडे दिले जाईल. याशिवाय प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान होणारा खर्चही भरला जाईल.
  • या सर्वांशिवाय ज्यांची निवड केली जाईल त्यांना आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी देखील दिली जाई

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sbi fellowship 2023 last date to apply may 31can get rs 17000 per month know who can apply snk

Next Story
भारतीय नौदलामध्ये अग्निवीर पदांसाठी होतेय मेगा भरती; २९ मेपासून करु शकता ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या पात्रता व निकष