काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी झालेल्या अपघाती स्फोटात १२ जवान जखमी झाले आहेत. यापैकी सात जवानांची प्रकृती गंभीर आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्कराचे युद्ध प्रशिक्षण केंद्र आहे. याठिकाणी ही घटना घडली. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या १२ जवानांना तातडीने श्रीनगरच्या लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या स्फोटामागचे नेमके कारण इतक्यात सांगणे शक्य नाही. मात्र, हा स्फोट अपघाती असावा. परंतु, या सगळ्या घटनेची सखोल चौकशी होईपर्यंत काहीही बोलणे योग्य नसल्याचेही यावेळी लष्कराकडून सांगण्यात आले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-08-2015 at 12:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 jawans injured in accidental explosion inside army camp