गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या मैत्रिणीसोबत संभोग करताना कंडोम नसल्याने चिकट पदार्थाने प्रायव्हेट भाग सील केला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अहमदाबादच्या फतेहवाडी भागात राहणारा सलमान मिर्झा २२ जून रोजी आपल्या मैत्रिणीसोबत जुहापुरा भागातील एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघांनी प्रथम ड्रग्जचे सेवन केले आणि नंतर शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे कंडोम नव्हते, म्हणून त्या मुलाने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चिकटवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून मैत्रीण गर्भवती होणार नाही.

दुसऱ्या दिवशी सलमान मिर्झा अहमदाबादमधील अंबर टॉवरजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळला. एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला झुडपात बेशुद्धावस्थेत पडलेले पाहिले आणि नंतर त्याला त्याच्या घरी नेले. तब्येत बिघडल्याने त्याला सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.

“सेक्समुळे मला…”; Olympics मध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणाऱ्या तिने सांगितलं यशाचं गुपित

या प्रकरणानंतर २५ जून रोजी मृत तरुणाचे नातेवाईक सैबानू मिर्झा यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिकट पदार्थाच्या वापरामुळे तरुणाचे आरोग्य बिघडले असावे असा संशय आहे आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपायुक्त प्रेमसुख डेलू यांनी सांगितले की, आम्ही मृताच्या काही नमुन्यांच्या अहवालाची वाट पाहत आहोत, जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 year old boy did such a thing while having sex with girlfriend srk