ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य दाखवणाऱ्या भारतीय सैन्य दलातील शूर आणि धाडसी सेना अधिकाऱ्यांचा सरकार सन्मान करणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मुरिदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी संघटनांचे अड्डे, पाकिस्तानी लष्कराची मालमत्ता यांना लक्ष्य करणाऱ्या अधिकाऱ्यांसह भारतीय वायुदलातील अधिकाऱ्यांनाही वीर चक्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
भारतीय वायुसेनेच्या चार अधिकाऱ्यांना युद्ध सेवा पदक
व्हॉईस चीफ एअर स्टाफ एअर मार्शल नरनादेश्वर तिवारी, वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, डीजी ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश भारती यांच्यासह चार भारतीय वायु सेना अधिकाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी युद्ध सेवा पदक देऊन गौरवण्यात येईल.
भारतीय वायुसेनेच्या १३ अधिकाऱ्यांना युद्ध सेवा पदक
भारतीय वायुसेनेच्या १३ अधिकाऱ्यांना पाकिस्तानवर हल्ला करुन ती मोहीम तडीस नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या कामगिरीबाबत युद्ध सेवा पदक देऊन गौरवण्यात येईल. यामध्ये एअर व्हॉसई मार्शल जोसेफ सुआरेस, एअर कमांडर अशोक राज ठाकुर यांचाही समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींतर्फे गॅलंट्री अवॉर्ड जाहीर करण्यात आले. यावर्षी ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या नायकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाने दिलेल्या यादिनुसार २३३ जवानांना गॅलंट्री अवॉर्ड देऊन सन्मानित केलं जाईल. तर १ हजाराहून अधिक जवानांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. हे पुरस्कार त्यांच्या नावे जाहीर करण्यात आले आहेत.
तीन अग्निवीरांना गॅलंट्री पुरस्कार
तीन अग्निवीरांनाही गॅलंट्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या तिघांचाही ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाचा सहभाग होता. त्यासाठी त्यांचा हा गौरव केला जाईल.
७ मे रोजी राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर
७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात भारतातल्या पर्यटकांवर हल्ला करुन २६ पर्यटकांचा जीव घेतला. त्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून त्या दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. १०० हून दहशतावाद्यांचा खात्माही या ऑपरेशन सिंदूरमध्ये राबवण्यात आला.