पीटीआय, नवी दिल्ली : ४५ पिस्तुलांच्या तस्करीप्रकरणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय दाम्पत्याला अटक करण्यात आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. या संदर्भातील तपासणी अहवालानंतरच पिस्तूल खरे आहेत की बनावट हे स्पष्ट होणार आहे, असे या दोघांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. परंतु राष्ट्रीय सुरक्षकांनी (एनएसजी) पिस्तूल बनावट नाहीत, असे स्पष्ट केले आहे. आरोपी व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरातून सोमवारी आले होते. त्यांच्यावर अधिकाऱ्यांची पाळत होती. त्यांच्यासोबत त्यांची नवजात मुलगी होती.   

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेने तिच्या पतीला या तस्करीत मदत केल्याचे आढळले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या पिस्तुलांची किंमत २२.५ लाख रुपये आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या मुलीला आजीकडे देण्यात आले.