पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीजवळील क्वेट्टा येथे शिया मुस्लिमांच्या वस्तीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये अनेक महिला, लहान मुलांसह ६३ ठार; तर सुमारे २०० जण जखमी झाले. पाकिस्तानात शियांवरील झालेला हा आजवरचा सवा्र्रत मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्वेट्टा येथील हजरा टाऊन या उपनगरातील किराणी रस्त्यावर हा स्फोट झाला. त्यात १०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला असावा असा अंदाज आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की त्यात दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लष्कर-ए-जंघ्वी या दहशतवादी संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानात भीषण स्फोटात ६३ ठार
पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीजवळील क्वेट्टा येथे शिया मुस्लिमांच्या वस्तीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये अनेक महिला, लहान मुलांसह ६३ ठार; तर सुमारे २०० जण जखमी झाले.
First published on: 17-02-2013 at 04:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 63 killed in pakistan blast