उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. १५ ऑगस्ट रोजी, देशभक्तीपर कार्यक्रमासाठी सराव करणाऱ्या मुलाचा तालमीदरम्यान मृत्यू झाला आहे. ९ वर्षांचा मुलगा देशभक्तीपर कार्यक्रमात शहीद भगतसिंगची भूमिका साकारणार होता. यासाठी तो सतत रंगीत तालीम करत होता. तालमीदरम्यान, फाशीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला आणि त्यामुळे शिवमचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय शिवम भगतसिंगची भूमिका करत होता. शिवम फाशीच्या भागाची तालीम करण्यासाठी स्टूलवर चढला होता. त्याने गळ्याभोवती फास घातल्याबरोबर अचानक खाली ठेवलेल्या स्टूलवरून तो घसरला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास घट्ट झाला. त्या वेळी तिथे असलेली मुले त्याला मदत करु शकली नाहीत. दरम्यान या घटनेत शिवमचा मृत्यू झाला. तर, मुलाच्या कुटुंबीयांकडून ही घटना अपघात असल्याचे सांगत त्यांनी कोणाविरोधात तक्रार केलेली नाही.

गळ्याला फास लागल्याने मुलाचा मृत्यू

शिवमच्या कुटुंबाने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता मुलावर अंत्यसंस्कार केले. पण परिसरातील लोक या घटनेमुळे खूप आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच, केवळ अपघातामुळे ही घटना घडल्याने कोणालाही दोष देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारी १० वर्षीय शिवम काही मुलांसोबत खेळत होता. त्याच्यासोबत गावातील प्राथमिक शाळेतील मुलेदेखील होती. या सर्व मुलांनी १५ ऑगस्टसाठी नाटकाचा सराव सुरू केला. यादरम्यान शिवमने भगतसिंगची भूमिका साकरली होती.

भगतसिंगची भूमिका साकारताना मृत्यू

शिवमने खाटेवर चढून फाशीचा दोर वर बांधला. त्याने मुलांना सांगितले की मी भगतसिंग सारखा फासावर लटकेल. त्याने गळ्यात दोर घालताच त्याच्या पायाखालून स्टूल सरकला आणि त्याच्या गळ्याभोवती फास बसला ज्यामुळे त्याचा जीव गुदमरला. तिथल्या मुलांना त्यावेळी काहीच समजले नाही. तितक्यात शिवम पूर्णपणे शांत झाला होता. त्यानंतर मुलांनी जोरजोरात आवाज केला आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले यानंतर शिवमच्या पालकांना तेथे बोलावून संपूर्ण प्रकरण सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 year old boy dies while rehearsing bhagat singh execution scene abn
First published on: 31-07-2021 at 11:54 IST