A Government Employee Raped A Goat : मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण वाढत असताना आता एक आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याने अवघ्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून त्याला समाधान मिळाले नाही म्हणून त्याने बकरीवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार व्हायरल व्हिडिओमार्फत समोर येताच पोलिसांनी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील ही घटना आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय गजेंद्र सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो एडीओ म्हणून काम करणारा सरकारी कर्मचारी आहे. सिंग त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी गेला होता. तिथे त्याला मुलगी एकटी दिसली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यावरही त्याचे समाधान न झाल्याने त्याने घरातील खांबाला बांधलेल्या शेळीवर बलात्कार केला.
हेही वाचा >> Mid Day Meal : मुख्याध्यापकांनी केली दिव्यांग विद्यार्थ्याला नॉनव्हेज खाण्याची सक्ती, तक्रारीनंतर निलंबन
X वर पोस्ट केलेल्या घटनेच्या कथित व्हिडिओंमध्ये, आरोपी एका कॉटवर झोपला आहे. त्याच्या बाजूला एक सहा वर्षीय मुलगी असून त्याने तिला त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तिचे चुंबनही घेतले. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आरोपी शेळीवर लैंगिक अत्याचार करताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये छह साल की लडकी का विनयभंग और बकरीपर किया बलात्कार pic.twitter.com/XjoIUE0tcc
— Viral Content (@ViralConte97098) August 13, 2024
शेजारी राहणाऱ्याने व्हिडिओ केला शूट
याप्रकरणी अहमदगड पोलिसांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सहारनपूरचा रहिवासी असलेला आणि शिकारपूर ब्लॉकमध्ये सहाय्यक विकास अधिकारी म्हणून तैनात असलेल्या आरोपीला ६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग आणि नंतर बकरीबरोबर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने बनवला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >> Mumbai Stunt : बसस्टॉप, बाईकवर हुल्लडबाज तरुणांचा मध्यरात्री जीवघेणा स्टंट; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
“बुलंदशहरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. गजेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने एका सहा वर्षाच्या निष्पाप मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवला, त्यानंतर त्याने एका शेळीशी अनैसर्गिक संभोगही केला. मूळचा सहारनपूरचा रहिवासी असलेला गजेंद्र सिंह हे शिकारपूर ब्लॉकमध्ये एडीओ पंचायतमध्ये सहाय्यक विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत”, असं पोलिसांनी सांगितलं.