शेजाऱ्याशी झालेल्या पैशाच्या वादातून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका महिलेसह तिच्या दोन लहान मुलींवर झोपेत असताना दोन व्यक्तींनी त्यांच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केल्याचा दावा पोलीसांनी केला आहे.
मुल्तान जिल्ह्य़ातील नौरंगाबाद गावातील अझिज माई तिच्या तानिया (४) आणि सानिया (२) या मुलींबरोबर आपल्या घरात झोपल्या असताना मंगळवारी सकाळी ही घटना घडली. काही दिवसांपुर्वी अझिज माई आणि तिचा शेजारी अल्ताफ बलूच यांच्यात पैशावरून वाद झाला होता. त्या वादातून हा हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची प्रभारी मुख्यमंत्री नजम सेठी यांनी गंभीर दखल घेतली असून पोलीसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान अल्ताफ बलुचलाचा साथीदार मुहम्मद नावेद याला अटक केल्याचा दावा पोलीसांनी केला असून बलूचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
महिलेसह तिच्या दोन लहान मुलींवर पाकिस्तानमध्ये अॅसिड हल्ला
शेजाऱ्याशी झालेल्या पैशाच्या वादातून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका महिलेसह तिच्या दोन लहान मुलींवर झोपेत असताना दोन व्यक्तींनी त्यांच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केल्याचा दावा पोलीसांनी केला आहे.
First published on: 23-04-2013 at 04:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acid attack on woman daughters in pakistan