अभिनेत्री पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच तिला मारहाण केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी तिचा नवरा सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सॅम बॉम्बेने मला ठार मारण्याची धमकी दिली, मारहाण केली असा आरोप दक्षिण गोव्याचे पोलीस अक्षीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे. गोव्यातील काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. १२ सप्टेंबरला या दोघांनी लग्न झाल्याची माहिती लग्नाचे फोटो पोस्ट करुन दिली होती.

पूनम पांडे एका चित्रीकरणासाठी दक्षिण गोव्यातील काणकोण या ठिकाणी आली आहे. तिच्यासोबत तिचा पती सॅम बॉम्बेही आला होता. मात्र पूनम पांडेने सॅम बॉम्बे विरोधात विनयभंग, ठार मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याची तक्रार नोंदवली आहे. ज्यानंतर सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली आहे.

पती सॅमने आपला विनयभंग केला, तसंच मारहाण करुन जिवे मारहाणीची धमकीही दिली. पूनम आणि सॅमचे याच महिन्यात लग्न झाले आहे. कोविडमुळे त्यांनी साधेपणाने लग्न केले होते. आज पती विरोधात तक्रार करणाऱ्या पूनम पांडेने चार दिवसांपूर्वीच हॅविंग बेस्ट हनीमून म्हणत एक व्हिडीओही पोस्ट केला होता.