Air India Flight Cancel : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर एअर इंडिया सावध पावलं टाकत आहे. कारण अहमदाबादमध्ये एका विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर आणखी १७ जून रोजी काही विमानांची उड्डाणे तांत्रिक कारणास्तव रद्द केले होते. त्यानंतर एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे १५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या मागची वेगवेगळी कारणे सांगितली होती. यानंतर आता एअर इंडियाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाने १९ मार्गांवरील विशेष विमानांची सेवा कमी करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. १९ मार्गांवरील नॅरोबॉडी फ्लाइट्स तात्पुरत्या स्वरूपात कमी केल्याची माहिती एअर इंडियाने एक्सवर (ट्विटर) दिली आहे. तसेच नेमकी कोणत्या १९ मार्गांवरील नॅरोबॉडी फ्लाइट्सची सेवा कमी केली? याची माहिती देखील दिली आहे.

एअर इंडियाने निवेदनात काय म्हटलं?

एका औपचारिक निवेदनात एअरलाइनने म्हटलं की, “ते त्यांच्या एकूण नॅरो-बॉडी फ्लाइट्स नेटवर्कमध्ये ५ टक्क्यांपेक्षा कमी तात्पुरती कपात करत आहेत. या निर्णयामुळे ३ मार्गांवरील एअर इंडियाच्या सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत आणि १९ मार्गांवरील विमानांची संख्या कमी करण्यात आली आहे. हे बदल किमान १५ जुलै २०२५ पर्यंत असतील”, असं म्हटलं आहे.

तीन मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित

-मुंबई-बागडोगरा (AI ५५१/५५२)-आठवड्यातून ७ वेळा उड्डाणे

-बेंगळुरू-सिंगापूर (AI २३९२/२३९३)-आठवड्यातून ७ वेळा उड्डाणे

-पुणे-सिंगापूर (AI२१११/२११०) -आठवड्यातून ७ वेळा उड्डाणे

कोणत्या १९ मार्गांवरील विशेष विमानांची सेवा कमी केली? वाचा यादी!

-बेंगळुरू-चंदीगड : आठवड्याच्या १४ वेळावरून आता ७ वेळा
-दिल्ली-बेंगळुरू : आठवड्याच्या ११६ वेळावरून आता ११३ वेळा
-दिल्ली-मुंबई : आठवड्याच्या १७६ वेळावरून आता १६५ वेळा
-दिल्ली-कोलकाता : आठवड्याच्या ७० वेळावरून आता ६३ वेळा
-दिल्ली-कोइम्बतूर : आठवड्याच्या १३ वेळावरून आता १२ वेळा
-दिल्ली-गोवा (दाबोलिम) : आठवड्याच्या १४ वेळावरून आता ७ वेळा
-दिल्ली-गोवा (मोपा) : आठवड्याच्या १४ वेळावरून आता ७ वेळा
-दिल्ली-हैदराबाद : आठवड्याच्या ८४ वेळावरून आता ७६ वेळा
-दिल्ली-इंदूर : आठवड्याच्या २१ वेळावरून आता १४ वेळा
-दिल्ली-लखनऊ : आठवड्याच्या २८ वेळावरून आता २१ वेळा
-दिल्ली-पुणे : आठवड्याच्या ५९ वेळावरून आता ५४ वेळा
-मुंबई-अहमदाबाद : आठवड्याच्या ४१ वेळावरून आता ३७ वेळा
-मुंबई-बेंगळुरू : आठवड्याच्या ९१ वेळावरून आता ८४ वेळा
-मुंबई-कोलकाता : आठवड्याच्या ४२ वेळावरून आता ३० वेळा
-मुंबई-कोइम्बतूर : आठवड्याच्या २१ वेळावरून आता १६ वेळा
-मुंबई-कोची : आठवड्याच्या ४० वेळावरून आता ३४ वेळा
-मुंबई-गोवा (दाबोली) : आठवड्याच्या ३४ वेळावरून आता २९ वेळा
-मुंबई-हैदराबाद : आठवड्याच्या ६३ वेळावरून आता ५९ वेळा
-मुंबई-वाराणसी : आठवड्याच्या १२ वेळावरून आता ७ वेळा