Amazon fires Palestinian software engineer : एका २९ वर्षीय पॅलेस्टिनी अभियंत्याला ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने नोकरीवरून काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा अभियंता कंपनीच्या इस्रायलबरोबरील संबधांविरोधात आंदोलनात सहभागी झाला होता. अहमद शाहरूर असे या अभियंत्याचे नाव असून या वर्षी ऑगस्ट महिन्यात मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांच्या कार्यालयाचा ताबा घेत निदर्शने करणाऱ्या सध्या कंपनीत काम करणाऱ्या आणि माजी अशा सात टेक कर्मचाऱ्यांमध्ये त्याचाही समावेश होता.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अहमद शाहरूर हा अमेझॉनच्या होल फूड्स बिझनेसमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. तसेच गेल्या महिन्यात त्याने कॉर्पोरेट स्लॅक चॅट रूमध्ये अमेझॉनच्या इस्रायलशी असलेल्या संबंधांवर टीक करत मेसेज पोस्ट केले होते. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर शाहरूर याने निषेध करत अमेझॉनच्या सिएटल मुख्यालय कॅम्पसमध्ये पत्रके वाटली.
अहमद शाहरूर याला का काढले?
अमेझॉनने केलेल्या चौकशीत अहमद शाहरूर हा कंपनीच्या अचारसंहितेचे, लेखी कम्युनिकेशन पॉलिसी आणि यूज पॉलिसीचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. कंपनीने आरोप केला की, त्याने कंपनीच्या संसाधनाचा गैरवापर केला, ज्यामध्ये कामाशी संबंध नसलेले आणि इस्रायल-पॅलेस्टिन संघर्षाशी संबंधित अनेक संदेश पोस्ट करणे याचाही समावेश होता.
अमेझॉनचे प्रवक्ते ब्रॅड ग्लासर यांनी ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही कामाच्या ठिकाणी भेदभाव, छळ किंवा धमकावणारे वर्तन किंवा इतर कोणताही भाषा सहन करत नाहीत, जेव्हा अशी वर्तवणूक लक्षात आणून दिले जाते तेव्हा आण्ही त्याची चौकशी करतो आणि समोर आलेल्या निष्कर्षांवर आधारित योग्य अशी कारवाई करतो.”
सीएनबीसीने अमेझॉन ह्यूमन रिसोर्सेस कर्मचार्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे, जो एका लेखी संदेशात म्हणतो की, “येत्या २४ तासांत तुम्हाला काढून टाकल्याबद्दल एक सविस्तर ईमेल मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला मिळाणारे लाभ आणि फायनल पे बद्दल माहितीही असेल. अमेझॉनबरोबरच्या काळात तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि तुमच्या भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा देतो.”
कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्याचे म्हणणे काय आहे?
गेल्या महिन्यात एका सहकार्याला पाठवलेल्या एका नोटमध्ये शाहरूर म्हणाला की, “अमेझॉन ही एक न्यूट्रल ऑब्झर्व्हर नाही. आपला सक्रिय सहभाग आहे.” शाहरूरने सीएनबीसीला सांगितले की, “ॲमेझॉनमध्ये असलेल्या पॅलेस्टिनी लोकांचा असंतोष दाबण्यासाठी आणि ॲमेझॉनच्या नरसंहारातील सहकार्याला अंतर्गत चौकशीपासून वाचवण्यासाठी केलेली निर्लज्जपणे बदला घेण्याची कृती आहे.
शहारूर यांच्याशी संबंधित एका कर्मचाऱ्याच्या गटाने एका प्रेस रिलीझमध्ये दावा केला की, अमेझॉनचा इस्रायली सरकार आणि सैन्याबरोबरचा १.२ अब्ज डॉलर्सचा करार, ज्याला प्रोजेक्ट निम्बस म्हणून ओळखले जाते आणि जो गाझामधील चालू असलेल्या नरसंहारात सहकार्य करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि या प्रोजेक्ट विरोधात आंदोलनने त्याला पाच आठवड्यांच्या निलंबनानंतर कामावरून काढण्यात आले.