Amul Milk Price Updates : देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी अमूलने त्यांच्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशल या १ लिटरच्या पाकिटांच्या दरामध्ये १ रुपयाने कपात केली आहे. याबाबत गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी माहिती दिली आहे. दरम्यान या दर कपातीमुळे अमूलच्या ग्राहकांना मोठा दिला मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, जून २०२४ मध्ये, अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. अमूलने केलेल्या या दरवाढीनंतर, मदर डेअरीनेही दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. या दर वाढीनंतर, अमूल गोल्डच्या ५०० मिली पाकिटाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपये झाली होती. तर एक लिटर अमूल गोल्डची किंमत ६४ रुपयांवरून ६६ रुपये प्रति लिटर झाली होते. तसेच अमूल ताजाच्या अर्ध्या लिटर पॅकसाठी ग्राहकांना २६ रुपयांऐवजी २७ रुपये मोजावे लागत होते. त्याच वेळी, अमूल शक्तीच्या अर्ध्या लिटर पॅकेटची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली होती.

जाणून घ्या नवे दर

हा नवा दर १ लिटर दुधाच्या पाकिटांवरच लागू होणार आहे. ग्राहकांना आता नव्या दरांनुसार अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशल दूध खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत दूध खरेदी करता यावे यासाठी अमूलने ही दर कपात केली आहे. दरम्यान आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे दुधाचे दर कमी केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दुधाचा प्रकार जुना दर नवीन दर
अमूल गोल्ड ६६ रुपये ६५ रुपये
अमूल फ्रेश ५४ रुपये ५३ रुपये
अमूल टी स्पेशल ६२ रुपये ६१ रुपये

नवीन दरांची घोषणा केल्यानंतर आता ६६ रुपये प्रति लिटर दराने मिळणारे अमूल गोल्ड ६५ रुपयांना मिळणार आहे. तर, अमूल ताजाची किंमत ५४ रुपयांवरून ५३ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. दुसरीकडे अमूल टी स्पेशल दुधाच्या एक लिटर पाकिटाची किंमत एक रुपयाने कमी होत ती ६२ रुपयांवरून ६१ रुपये होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amul milk price reduction re 1 per litre variants update amul news milk rates 2025 aam