अमरावती : कौशल्य विकास महामंडळ घोटाळाप्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाने नायडू यांच्या चार आठवडय़ांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाचे नियमित जामिनात रूपांतर केले आणि चंद्राबाबूंना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> इस्रायली फौजांकडून गाझातील आणखी एक रुग्णालय लक्ष्य

न्यायालयाने नायडू यांनी आधीच जमा केलेल्या जातमुचलक्यावर नियमित जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तथापि कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणाशी संबंधित कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करणे किंवा सार्वजनिक सभा, फेरी, मोर्चा, बैठक आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होण्यावर त्यांना बंदी घालण्यात आली आहे. अंतरिम जामिनाच्या अटी २८ नोव्हेंबपर्यंत चंद्राबाबूंना बंधनकारक राहतील. २९ नोव्हेंबरपासून हे निर्बंध शिथिल करण्यात येतील. याशिवाय चंद्राबाबूंनी आपला वैद्यकीय तपासणी अहवाल राजा महेंद्रवरम केंद्रीय कारागृह अधीक्षकांना सोपवण्याऐवजी २८ नोव्हेंबर किंवा त्याआधी विजयवाडा येथील विशेष न्यायालयास सुपूर्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra hc grants regular bail to ex cm chandrababu naidu in skill development scam case zws