लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या एलसीए तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला. तेजस हे हिंदुस्थान एरोनॉटिक्सने बनवलेले हलके लढाऊ विमान आहे. या फायटर विमानाचा हवाई दलातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. बंगळुरु येथे सुरु असलेल्या ‘एरो इंडिया, एअर शो’ दरम्यान बिपीन रावत यांनी तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला.
Chief of the Army Staff General Bipin Rawat: Flight in LCA Tejas was an experience of a lifetime. From what I could witness, avionics are very good, it's targeting is very good. It's a wonderful aircraft if it gets added to inventory it will increase our air power. pic.twitter.com/WwUcFC6ekT
— ANI (@ANI) February 21, 2019
तेजसमधून उड्डाण हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे. तेजस उत्तम विमान असून अचूकतेने लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. तेजसच्या समावेशाने हवाई दलाची ताकत आणखी वाढेल असे बिपीन रावत म्हणाले. सरकारचे वैज्ञानिक सल्लागार पी.एस.राघवन सुद्धा तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत.
तेजस छोटे, हलके लढाऊ विमान असले तरी अन्य मोठया फायटर विमानांप्रमाणे हे विमान सुद्धा अत्याधुनिक शस्त्रास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. तेजसमधून क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे शत्रू विमानावर हल्ला करता येऊ शकतो.