Army jawan killed 2 injured in landmine blast in Poonch Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या भूसुरुंग स्फोटात एक लष्कराचा जवान ठार झाला आहे. तर इतर दोन जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पीटीआयला दिली.

एरिया डॉमिनेशन पॅट्रोलदरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये हा भूसुरुंग स्फोट झाला. यामध्ये एका अग्निवीर जवानाचा मृत्यू झाला तर जेसीओसह इतर दोन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले जात आहे.

व्हाईट नाईट कोर्प्सने एक्सवर पोस्ट करताना श्रद्धांजली वाहिली आहे. “जीओसी व्हाईट नाईट कोर्प्स आणि ऑल रँक्स ७ जेएटी रेजिमेंटचे अग्निविर ललित कुमार यांना श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी कृष्णा घाटी ब्रिगेडच्या जनरल एरियामध्ये भूसुरुंग स्फोटात एरिया डॉमिनेशन पॅट्रोलिंगवर असताना सर्वोच्च बलिदान दिले.”

या दुखःद प्रसंगात आम्ही जवानाच्या कुटुंबाबरोबर असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.