नवी दिल्ली : विख्यात कला इतिहासकार आणि लेखक ब्रिजेंदर नाथ गोस्वामी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांना फुप्फुसाच्या संसर्गावर उपचारासाठी चंडीगड येथील रुग्णालयात दाखल केले होते. बी एन गोस्वामी यांच्या पश्चात मुलगी मालविका आहे. त्यांची पत्नी करुणा याही कला इतिहासकार होत्या. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोस्वामी यांनी पहाडी शैलीच्या चित्रकलेवर विपुल प्रमाणात संशोधन केले होते. या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९५८ मध्ये सनदी सेवेतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून त्यांनी संशोधन आणि लेखनासाठी कारकीर्द घडवली. पहाडी चित्रे, लघुचित्रे, दरबारी चित्रे आणि भारतीय चित्रे या विषयाला वाहिलेली २६ पेक्षा जास्त पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. कला, साहित्य आणि भाषणांमध्ये मांजरांनी विविध प्रकारे पटकावलेले स्थान या विषयावरील ‘द इंडियन कॅट : स्टोरीज, पेंटिग्ज, पोएट्री अँड प्रोव्हर्ब’ हे त्यांचे सर्वात अलिकडील पुस्तक २०२३ मध्ये प्रकाशित झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art historian b n goswamy passes away at 90 zws