जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्य़ात लष्करी तळावर रविवारी दहशवाद्यांनी हल्ला केला. लष्कराने प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला, यात एक दहशतवादी ठार झाला. शोपियानमधील पिंजोरा परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशवाद्यांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत दहशतवादी हल्यांमध्ये वाढ झाली असून फेब्रुवारीमध्ये सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात सहा जवान शहीद झाले होते. लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2018 रोजी प्रकाशित
लष्करी तळावर हल्ला, दहशतवादी ठार
लष्कराने प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला, यात एक दहशतवादी ठार झाला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-03-2018 at 03:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack of the military camp in shopian district