प्राप्तिकराचा परतावा भरण्याची असलेली ३१ मार्चची अंतिम मुदत आणि या आठवडय़ात आलेल्या सुटय़ा या पाश्र्वभूमीवर देशभरातील सर्व प्रमुख बँकांनी आपापल्या शाखा २९ ते ३१ मार्च या दरम्यान सुरूच ठेवाव्यात असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने काढले आहेत. करभरणा करणाऱ्यांची पंचाईत होऊ नये म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत. २९ मार्चला गुड फ्रायडे असून ३० व ३१ मार्चला अनुक्रमे शनिवार-रविवार आहे.
करपरतावा भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. मात्र, होळी, धुळवड व गुड फ्रायडे व त्यानंतर शनिवार-रविवार अशा ओळीने सुटय़ा आल्याने करभरणा करणाऱ्यांसाठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळेच रिझव्‍‌र्ह बँकेने २९ ते ३१ मार्च या दरम्यान सर्व बँकांनी आपापल्या शाखा करसंकलनासाठी सुरू ठेवाव्यात असे आदेश दिले आहेत.
करदात्यांना करभरणा करणे अधिक सोपे व्हावे यासाठी काही निवडक बँकांनी निवडक एटीएमवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, प्राप्तिकर व अप्रत्यक्ष कर कार्यालयेही ३० व ३१ मार्च रोजी सुरूच राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank business will continue from 29 to 31 march