आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गत विश्वचषकात आम्ही विजेतेपदाच्या समीप पोहोचूनदेखील स्वप्न साकार करू शकलो नव्हतो. त्यामुळे यंदाचा विश्वचषक पटकावण्यासाठी आवश्यक ते सारं काही करू, असे न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याने सांगितले.

विश्वचषकातील प्रारंभीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दणदणीत पराभव करीत त्यांच्या अभियानाला दमदार प्रारंभ केला आहे. ‘‘यंदाच्या विश्वचषकात आम्ही प्रमुख दावेदार आहोत, असे मी म्हणणार नाही. परंतु, आम्ही एक बलवान संघ निश्चितच आहोत. त्यामुळे मागील विश्वचषकात हुकलेली संधी साधण्याचे आमचे लक्ष्य असेल,’’ असे गप्टिलने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best efforts to win the world cup says