या वर्षामध्ये कलाविश्वात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर कलाविश्वातील अन्य काही सेलिब्रिटींच्या आत्महत्येचीही प्रकरणं समोर येत आहेत. यामध्येच भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिनेदेखील आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अनुपमा पाठक हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुपमाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका पत्रात आत्महत्या करण्यामागील दोन कारणं सांगितली आहेत. तसंच आत्महत्येपूर्वी तिने एक फेसबुक लाइव्ह करत चाहत्यांशी संवाददेखील साधला होता. यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

“एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या जवळचे लोक, मित्र परिवार म्हणतात, की आम्हाला आधी का सांगितलं नाही, आम्ही मदत केली असती. परंतु, या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात कोणीच मदत करत नाही. काही जण उगाच आत्महत्या करत नाहीत. त्यामागे काही कारणं असतात. मी फार जवळून अनुभव घेतलाय लोक तुमच्या बोलण्याचा कधीच सरळ विचार करत नाहीत. ते कायम चुकीचा अर्थ काढतात. जर तुम्ही कोणाला सांगितलं की मी आत्महत्या करणार आहे., तर काही जणांची पहिली प्रतिक्रिया असते.. हे आम्हाला नको सांगू उगाच आमचं नाव या प्रकरणात येईल. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका. सगळे खोटारडे आणि स्वार्थी असतात. कोणीच कोणाच्या मदतीसाठी येत नाही”, असं अनुपमाने फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, अनुपमा भोजपुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने दहिसर येथे राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojpuri bhojpuri film and tv actress anupama pathak commit suicide ssj