एकाएकी अदृश्य झालेल्या मलेशियन एअरवेजच्या विमानाचे गूढ अद्यापही उकलताना दिसत नाही़  हिंदी महासागरात सर्वत्र विविध पद्धतीने शोध घेतल्यानंतरही विमानाचा काहीही मागमूस न लागल्यामुळे आता हे विमान समुद्रात कोसळलेच नसावे, असा तर्क लढविला जात आह़े  समुद्राऐवजी विमान अन्यत्रच उतरले असावे, असा तर्क येथील माध्यमांद्वारे मांडण्यात आला आह़े
न्यू स्ट्रेट टाइम्सच्या अहवालानुसार, मलेशियन एअरवेजचे एमएच३७० हे विमान हिंदी महासागरात उतरले नसून अन्यत्रच उतरले असावे, असे आंतरराष्ट्रीय शोधचमूचे म्हणणे आह़े   
येत्या काही दिवसांत शोधकार्यात अपेक्षित निकाल न मिळाल्यास या शक्यतेनुसार नव्याने तपास करण्यात येईल़  परंतु, त्याच वेळी हिंदी महासागरातील शोधकार्यही सुरूच ठेवण्यात येणार आहे, असेही शोधचमूचे म्हणणे आह़े
विमान अन्यत्र उतरल्याचा विचार अगदीच अशक्य नाही़  कारण आम्हाला विमानाशी संबंधित एकही पुरावा हिंदी महासागरात सापडला नाही़  परंतु, २०हून अधिक देश शोध घेत असलेले विमान कोण्या एका देशाकडून लपवून ठेवले असण्याची शक्यताही अवाजवी आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आह़े  त्यामुळे हे विमान एखाद्या दुर्गम ठिकाणी उतरले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े