सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी तब्बल ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुणाल घोष हेही एक आरोपी आहेत.
एकाच दिवशी विक्रमी गुन्हे दाखल करताना विभागाने ओडिशा पोलिसांकडून ४२ गुन्हे आपल्याकडे हस्तांतरित केले असून पश्चिम बंगालमधील नव्या तीन गुन्’ाांचा समावेश करण्यात आला आहे. शारदा समुहाचे अध्यक्ष सुदिप्ता सेन, शारदा रिएल्टीचे तत्कालिन संचालक देबजानी मुखर्जी व शारदा मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल घोष यांचीही या प्रकरणात आरोपी म्हणून नावे घेण्यात आली आहेत. समुहातील चार कंपन्यांची नावे यात आली आहेत. ओडिशातील ४३ गुन्’ाांमध्ये तेथील ४३ कंपन्यांसह त्यांच्या संचालकाची नावे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तपासा दरम्यान भांडवली बाजार नियामक सेबी, रिझव्र्ह बँक तसेच कंपनी व्यवहार खाते यांची या घोटाळ्यात काही भूमिका आहे का, हेही तपासले जाईल, असेही तपास विभागाने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2014 रोजी प्रकाशित
शारदा चिट फंड: एकाच दिवशी ४६ जणांविरुद्ध गुन्हे
सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी तब्बल ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
First published on: 05-06-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi registers 46 firs in saradha chit fund scam