बँकाकमध्ये २० लोकांचा बळी घेणाऱ्या बाँबस्फोटाचे विश्वासार्ह धागेदोरे अद्याप हाती लागले नसले, तरी एका नव्या सीसी टीव्ही फुटेजमुळे पोलिसांना तपासाची आशा निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी दुसरा बाँबस्फोट झाला, तेथे एक अनोळखी व्यक्ती एका कालव्यात एक पॅकेट फेकत असल्याचे या चित्रिकरणात दिसून येत आहे.
स्थानिक दूरचित्रवाहिन्यांकडून मिळालेल्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक माणूस पादचारी पुलावरून एक पॅकेज त्याच ठिकाणी फेकत असल्याचे दिसत आहे, जेथे मंगळवारी स्फोट झाला होता. यात कुणीही जखमी झाले नव्हते.बाँबस्फोटातील मुख्य आरोपीचे रेखाचत्रि आणि व्हिडिओ पोलिसांनी जारी केला आहे. परदेशी व्यक्ती असलेला हा माणूस एका नेटवर्कसाठी काम करत असल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध जारी ठेवला असला तरी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2015 रोजी प्रकाशित
थायलंडमधील स्फोटाच्या चित्रिकरणामुळे पोलिसांना आशा
बँकाकमध्ये २० लोकांचा बळी घेणाऱ्या बाँबस्फोटाचे विश्वासार्ह धागेदोरे अद्याप हाती लागले नसले

First published on: 23-08-2015 at 05:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv helps to thiland police