VIDEO: चोर दुचाकी घेऊन पळून जात असतानाच गेटवरील सुरक्षारक्षकाने पाहिलं, गेट बंद करण्यासाठी धावला अन्... | CCTV of Bike Thieves Rammed into gate of Delhi Colony is viral sgy 87 | Loksatta

VIDEO: चोर दुचाकी घेऊन पळून जात असतानाच गेटवरील सुरक्षारक्षकाने पाहिलं, गेट बंद करण्यासाठी धावला अन् तितक्यात…

गेट बंद होईल म्हणून वेगाने दुचाकी पळवत होते, पण सुरक्षारक्षकाने केलं असं काही…

VIDEO: चोर दुचाकी घेऊन पळून जात असतानाच गेटवरील सुरक्षारक्षकाने पाहिलं, गेट बंद करण्यासाठी धावला अन् तितक्यात…
दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल

महापालिका अधिकारी असल्याचं सांगत दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना एका सुरक्षारक्षकाने जन्माची अद्दल घडवली आहे. हे चोर एका डिलिव्हरी एजंटची दुचाकी चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखवत गेट बंद केला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. दिल्लीमधील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

स्थानिकांनी एका चोराला पकडलं असून, दुसरा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. शेजारी असणाऱ्या एका पार्कमध्ये तो लपला होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.

हे चोर महापालिका अधिकारी असल्याची बतावणी करत इमारतीत शिरले होते. आपण पाहणी करण्यासाठी आल्याचं त्यांनी एव्हरेस्ट अपार्टमेंटमधील रहिवाशांना सांगितलं होतं. दुपारी २ वाजता त्यांना एक दुचाकी चोरण्याची संधी मिळाली. कुरिअर डिलिव्हरीसाठी आलेल्या तरुणाने दुचाकीची चावी काढलेली नाही हे पाहून दोघेही पुढे सरसावले होते.

संधी मिळताच दोघे दुचाकीवर स्वार झाले आणि पळून जाऊ लागले. यावेळी गेटवर तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकाने डिलिव्हरी एजंटचा आवाज ऐकला. त्याने चोरांना रोखण्यासाठी गेट बंद करण्यास सुरुवात केली. यावेळी वेगाने निघालेले हे चोर दुचाकीसह गेटवर आदळले आणि खाली पडले.

स्थानिकांनी कंट्रोल रुमला फोन करुन माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Railway Bonus: दसऱ्याआधीच रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार; ११ लाख कर्मचारी ठरणार ‘लाभार्थी’

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
कंबरेला Paytm QR कोड बांधून उच्च न्यायालयाचा शिपाई घेता होता पैसे; न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
Viral Video: लग्नाला नकार दिला म्हणून मुलीचं अपहरण, मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या कुटुंबीयांवर रोखली बंदूक अन्…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू
पुणे: एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी; ४४२ महाविद्यालयात खास शिबिरे