छत्तीसगडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा गावात असलेल्या एका सरकारी शाळेतील बावन्न वर्षीय मुख्याध्यापकाने एप्रिल महिन्यात दहावीच्या वर्गात शिकत असणाऱया विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यानंतर हे प्रकरण गावातील पंचायतीने गावामध्येच मिटविले होते.
त्यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांना समजल्यानंतर चौकशी करण्यात आली व आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.