करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन सारखे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याबरोबरीने आणखी काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. एनडीटीव्हीने हे उपाय सुचवले आहेत.
– करोना व्हायरस हे भारतासमोरचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट आहे हे मान्य करावे, वस्तुस्थिती नाकारु नये.
– करोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी दोन लाख कोटी रुपये बाजूला काढावेत. त्यापेक्षाही जास्त निधी खर्च करण्याची तयारी ठेवावी.
– करोना व्हायरसची चाचणी आणि उपचार पूर्णपणे मोफत करावेत. प्रत्येकाला चाचणी आणि उपचार घेणे शक्य झाले पाहिजे.
– जो शत्रू तुम्हाला दिसत नाही, त्याविरोधात तुम्ही लढू शकत नाही. दक्षिण कोरियाप्रमाणे खासगी क्षेत्राला चाचण्यांची परवानगी द्यावी. करोना व्हायरसच्या चाचण्या जलदगतीने व्हाव्यात यासाठी, आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या टेस्टिंग किट वापरायला परवानगी द्यावी. अमेरिका आणि युरोपमध्ये वापरात असलेले किट भारतातही वापरायला परवानगी द्वावी.
– खासगी रुग्णालयांना करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचाराची परवानगी द्यावी.
– लोकांच्या घरापर्यंत जाऊन करोना व्हायरसच्या चाचण्या कराव्यात. कोणीही चाचणीसाठी रुग्णालयापर्यंत येऊ नये, त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असतो.
– करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणारी खासगी रुग्णालये आणि खासगी प्रयोगशाळांना भरपाई द्यावी.
– करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस यांना मास्क, ग्लोव्होज आणि बॉडी सूटची कमतरता भासू नये यासाठी हे साहित्य लवकरात लवकर आयात करावे.
– अन्नधान्याच्या साठयाचा वापर करावा, पुढचे दोन महिने अन्य धान्याचे मोफत वाटप करावे.
– अनेक व्यवसाय बंद आहेत. कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांचे रोजगार जाऊ शकतात. त्यामुळे उद्योग विश्वासाठी भारत सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे.