भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याची लढत सुरू आहे. न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिलं आहे. पण भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघा १ धाव काढून माघारी परतले. सोशल मीडियावर या सामन्याचीच जोरदार चर्चा असून भारताच्या खेळीवर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

टीम इंडियाला आता फक्त आजीची प्रार्थनाच वाचवू शकते, असा मीम एकाने शेअर केला. तर काहींनी भारताच्या विकेट्सवर मजेशीर मीम्स पोस्ट केले आहेत. तर एकाने चक्क आता मोदीच फलंदाजी करायला येत असल्याचं भन्नाट मीम शेअर केलं आहे. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

चार विकेट्सनंतर भारतीयांची परिस्थिती..

भारतीय क्रिकेटप्रेमींची सध्याची अवस्था..

आता थेट मोदीच क्रिकेटच्या मैदानावर…

प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीची सध्याची मागणी..

https://twitter.com/PranjalBareth/status/1148914745522569216

महेंद्रसिंह धोनीला विनंती..

वन-डे क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. पावसामुळे मंगळवारी स्थगित झालेला सामना आज खेळविण्यात येतोय. मात्र आता नेटकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा आहे असं या मीम्समध्ये पाहायला मिळतंय.