भारतीय वायूसेनेकडून दहशतवादी तळ नष्ट केल्याच्या २४ तासानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाल्याचे दिसत नाही. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सीआरपीएफचे डीजी आर आर भटनागर यांना यासंबंधी विचारलं असता त्यांनी यश मिळत राहणार अशी प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन्स सुरु आहेत, सुरु राहणार, यश मिळत राहणार असं सांगत भटनागर असं भटनागर यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोपियाँतील मेमरेंड परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती. तर दुसरीकडे सीमेपारहून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना दिसत आहे. भारतीय वायूसेनेने एअर स्ट्राइक केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानी लष्कर भारतातील ग्रामीण भागातील घरांवर तोफांचा मारा करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्हीकडून गोळीबार थांबला असून सुरक्षादलाकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf dg rr bhatnagar on two jem terrorists neutralised in jks shopian