Cyclone Michaung Update in marathi : मिचौंग चक्रीवादळाने तमिळनाडूत धुमाकूळ माजवल्यानंतर हे वादळ आज आंध्र प्रदेशमधील बापटलाजवळ धडकणार आहे. सप्टेंबर २०१ मध्ये गुलाब चक्रीवादळ आले होते, त्यानंतर दोन वर्षांत किनारा ओलांडणारे मिचौंग हे पहिले वादळ ठरले आहे. मिचौंगच्या वाऱ्याचा वेग तीव्र चक्रीवादळाच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ९०-१०० किमी प्रतितास असा स्थिर वेग ११० किमी प्रतितास आहे. हवामान प्रणाली ७ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते डीप डिप्रेशनमध्ये बदलेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश किनार्‍यापासून आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्‍यावर धडकणार आहे. गेल्या सहा तासांत सात किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने हे वादळ सरकले आहे. आज पहाटे २.३० वाजता नेल्लोरच्या २० किमी उत्तर-ईशान्येस, चेन्नईच्या १७० किमी उत्तरेस, बापटलापासून १५० किमी दक्षिणेस आणि मछलीपट्टनमच्या २१० किमी दक्षिण-नैऋत्येस मध्यभागी वादळाची दिशा होती.

मिचौंग चक्रीवादळाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशातील जिल्हाधिकारी हाय अलर्टवर आहेत. कारण, मिचौंग चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे खबरदारीचा उपाय केला जात आहे.

दरम्यान, दक्षिण भारतात धुमाकूळ माजवलेल्या या मिचौंग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तामिळनाडूत हाहाकार

मिचौंग चक्रीवादळामुळे सोमवारी चेन्नईत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चैन्नईसह अनेक शहरं मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली. चेन्नई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार , हजारो लोकांना सरकारी आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले होते, कमीतकमी ४०० विवाह हॉल विस्थापित कुटुंबांना राहण्यासाठी तयार केले गेले होते. चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांमध्ये हवामान लक्षात घेता सरकारने सोमवार आणि मंगळवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

शिवाय, बचाव कार्य करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २५० कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या १० टीम बाधित जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. या पथकांनी पूरग्रस्त भागातील रहिवाशांना बाहेर काढण्यात आणि मदत पुरवण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone michoung moves in most threat to this state what is the weather condition of maharashtra sgk
First published on: 05-12-2023 at 08:51 IST