Dabur Vs Patanjali : दिल्ली उच्च न्यायालयाने जाहिरातींमध्ये डाबर कंपनीच्या च्यवनप्राशची कथितरित्या बदनामी केल्या प्रकरणी दाखल प्रकरणात, पतंजली आयुर्वेद कंपनीला आपले म्हणणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. न्याय‍धीश मिनी पुष्करणा यांनी २४ डिसेंबर रोजी प्रतिवादी पतंजली आयुर्वेद आणि पतंजली फूड्स लिमिटेड यांना समन्स जारी करत या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात तक्रार ही खटला म्हणून नोंदवून घेत समन्स बजावण्यात यावे असेही म्हटले आहे. तसेच प्रतिवाद्यांना आजपासून ३० दिवसांच्या आत लिखित म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डाबर कंपनीने आरोप केला होता की, ‘पतंजली स्पेशल च्यवनप्राश’ची जाहिरात करताना खोटे आणि जणीवपूर्वक आरोप करण्यात आले, ज्यामुळे त्यांचे उत्पादन डाबर च्यवनप्राशची बदनामी झाली. डाबर च्यवनप्राश हे ६० टक्क्यांहून अधिक हिस्सेदारीसह बाजारातील सर्वात प्रसिद्ध उत्पादन आहे. तसेच न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर देखील नोटीस जारी करण्यात आली असून पुढील सुनावणीसाठी ३० जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, जाहिरातींमध्ये प्रतिवादांनी दावा केला आहे फक्त पतंजली स्पेशल च्यवनप्राशच अस्सल आहे. त्यामुळे हे विशेष आणि सर्वोत्तम च्यवनप्राश आहे, जे चरक, सुश्रुती, धन्वंतरी, च्यवन ऋषि यांनी सांगितलेल्या विधीनुसार तयार करण्यात आले आहे आणि इतर च्यवनप्राश निर्मात्यांना याबद्दल कसलीच माहिती नाही आणि त्यामुळे ते सर्वसाधारण आहेत.

हेही वाचा>> पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक…

फिर्यादीत म्हटले आहे की, प्रतिवादींनी टीव्हीसी आणि प्रींट जाहिरातींमध्ये दावा केला आहे की प्रतिवादींनी वापरलेले आयुर्वेदिक पुस्तक हे च्यवनप्राश बनवण्याची मूळ रेसिपी आहे, ज्यामधून डी अँड सी (ओषधे आणि सौंदर्य प्रसाधने) अधिनियमाच्या पहिल्या अनुसूचीतील इतर आयुर्वेदिक पुस्तकांना बिनकामाचे म्हटले आहे. याचिकेत प्रतिवादींना च्यवनप्राश- डाबर च्यवनप्राशसह दावा करणाऱ्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवणाऱ्या जाहिराती टीव्ही किंवा इतर माध्यमातून प्रसारित करण्यावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabur vs patanjali delhi high court seeks patanjali ayurved stand on lawsuit by dabur over chyawanprash disparaging ad case marathi news rak