बनावट पदवी प्रकरणी दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना दिलासा दिला आहे. मंगळवारी पटियाला हाऊस न्यायालयाने स्मृती इराणी यांना याप्रकरणी समन्स बजावण्याची मागणी करणारी याचिका रद्द केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडे इराणींच्या शिक्षणासंबंधातील दस्ताऐवज जमा करण्यात आले होते.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिल्याचा स्मृती इराणींवर आरोप आहे. इराणी यांनी २००४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्याचे सांगितले होते. इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी निवडणूक आयोग आणि दिल्ली विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी या याचिकाकर्ते अहमर खान यांच्या अर्जाला परवानगी दिली होती.
हे आहेत आरोप
मागील दोन निवडणुकांत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत वेगवेगळी माहिती दिली असल्याचा इराणी यांच्यावर आरोप आहेत. स्मृती इराणी यांनी राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि लोकसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पदवी बाबत वेगवेगळी माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. एका प्रतिज्ञापत्रात त्या बी.कॉम तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात त्या बीए उत्तीर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.
न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाला इराणी यांच्या पदवीबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ता अहमर खान यांनी एप्रिल २०१५ मध्ये इराणी यांच्याविरोधात तक्रार केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi court dismisses plea to summon union minister smriti irani in degree case