Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्ताता | Delhi Riots 2020 Umar Khalid acquitted in Delhi riots case msr 87 | Loksatta

Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता

मागील सुनावणीत दिल्ली पोलिसांनी उमर खालिदच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता.

Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
(फोटो-एएनआय)

Delhi riots 2020: दिल्लीच्या कडकड्डूमा न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मधील दंगलीप्रकरणी आज(शनिवार) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद आणि खालिद सैफी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलत्स प्रमाचला यांनी हा आदेश दिला.

न्यायालयाने उमर खालिद आणि खालिद सैफी यांच्याशिवाय तारिक मोईन रिझवी, जागर खान आणि मो इलियास यांनाही दोषमुक्त केले.
आरोपी तारिक मोइन रिझवी, जागर खान, मोहम्मद इलियास, खालिद सैफी आणि उमर खालिद यांना कलम ४३७ -ए-सीआरपीसी अंतर्गत १० हजार रुपयाच्या मुचलक्यासह एवढीच जामिनाची रक्कम जमा करण्याचे नर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, या आदेशाची प्रत संबंधित आरोपींना कळवण्यासाठ संबंधित कारगृह अधीक्षकांना पाठवण्यााचे निर्देश न्यायालायने दिले आहेत.

तर ताहिर हुसैन, लियाकत अली, रियासत अली, शाह आलम, मोहम्मद शादाब, मोहम्मद आबिद, रशीद सैफी, गुलफाम, अर्शद कय्युम, इर्शाद अहमद आणि मोहम्मद रिहान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

मागील सुनावणीत दिल्ली पोलिसांनी उमर खालिदच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. खालिदच्या सुटकेमुळे समजात अशांतता निर्माण होईल, असे म्हणत दिल्ली पोलिसांनी उमर खालिदच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. बहिणीच्या लग्नासाठी उमर खालिद याने दोन आठवड्यांसाठी न्यायालयासमोर अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. या काळात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे त्याने सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 21:47 IST
Next Story
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?