गेल्या शुक्रवारी माउंट एव्हरेस्ट जगातील उंच शिखरावरून हिमकडे कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता एका व्यक्तीच्या उडीच्या स्टंटचे थेट प्रक्षेपण ११ मे रोजी डिस्कव्हरी वाहिनीवर करण्यात येणार होते, तो कार्यक्रम डिस्कव्हरी नेटवर्कने रद्द केला आहे. विंग सूटच्या मदतीने जंपर जॉबी ओगवेन हे हा स्टंट करणार होते.
नेटवर्कच्या प्रवक्तया लॉरी गोल्डबर्ग यांनी सांगितले की, हिमकडे कोसळून जे शेर्पा मरण पावले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. जंपर जॉबी ओगवेन हे सध्या एव्हरेस्टवर असून ते तेथून उडी मारणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण ११ मे रोजी डिस्कव्हरी वाहिनीवर केले जाणार होते, ते आता केले जाणार नाही.
 ओगवेन हे हिमकडे कोसळल्याच्या घटनेत जखमी झालेले नाहीत. डिस्कव्हरी वाहिनीला या स्टंटमध्ये अनेक तासांचे चित्रण व चांगले टीव्ही रेटिंग अपेक्षित होते.