डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमीनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारीत आवृत्तीची ‘आकाश प्राईम’ ची यशस्वी चाचणी आज घेतली. ओडिशातील चांदीपुर इथल्या एकात्मित चाचणी तळावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या आकाश क्षेपणास्त्राच्या तुलनेत नव्या दमाच्या आकाश प्राईममध्ये स्वदेशी उपकरणांचा जास्त वापर करण्यात आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश प्राईममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणखी अचुकतेने ग्रहण करणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच उंचावर गेल्यावर थंड हवेतही खात्रीशीर काम करु शकेल अशा पद्धतीच्या सुधारणा या आकाश प्राईममध्ये करण्यात आल्या आहेत. आकाश प्राईमची चाचणी करतांना जमिनीवरील आवश्यक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्वांमुळे जमीनीवरुन हवेतील लक्ष्यभेद करण्याची भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.     

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drdo successfully tested akash prime missile
First published on: 27-09-2021 at 22:24 IST