dubai hindu temple hindu temple opens in dubai for devotees zws 70 | Loksatta

दुबईतील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले

भारतीय आणि अरेबिक स्थापत्यकलेचे मिश्रण असलेल्या या मंदिराची रचना २०१९ मध्ये करण्यात आली होती.

दुबईतील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले

* दुबईच्या जेबेल अली गावात बांधण्यात आलेले हिंदू मंदिर बुधवारी, दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांसाठी खुले करण्यात आले. भारतीय आणि अरेबिक स्थापत्यकलेचे मिश्रण असलेल्या या मंदिराची रचना २०१९ मध्ये करण्यात आली होती. दोन वर्षांत ते बांधून पूर्ण करण्यात आले.

* सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि भारताचे यूएईतील राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हे मंदिर सहिष्णुता, शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक असेल, असे यावेळी नाहयान आणि सुधीर यांनी सांगितले.

* यूएईमध्ये ३५ लाख भारतीय असून या देशांत हिंदू मंदिर बांधण्याची त्यांची इच्छा होती. ही इच्छ यूएई सरकारने पूर्ण केल्याबद्दल सुधीर यांनी आभार मानले.

* ७० हजार चौरस फुटांत हे मंदिर विस्तारले असून हे मंदिर खुले केल्यानंतर पुजाऱ्यांनी ‘ओम् शांती ओम्’चा जयघोष करत भाविकांचे स्वागत केले. यावेळी तबला आणि ढोल वाजवण्यात आले.

* या मंदिरात १६ देवी-देवतांच्या मूर्ती असून एकाच वेळी हजारो भाविक या मंदिराला भेट देऊ शकतात. * जेबेल अली हे गाव सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात सात चर्च, एक गुरुद्वार आणि आता नवे हिंदू मंदिर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पंतप्रधान मोदींची हिमाचल प्रदेशात काँग्रेसवर टीका

संबंधित बातम्या

Gujarat Election Results 2022 Live: गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “सर्व चॅम्पियन…”; वाचा प्रत्येक अपडेट
Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, आता सत्तास्थापनेची तयारी
गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”
गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…”
मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“वरुणशी ब्रेकअप झाल्यानंतर अपूर्व…” बॉयफ्रेंडचं कौतुक करत दिव्या अग्रवालने दिलं ट्रोलर्सना उत्तर
गुजरात विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर कोल्हापुरात भाजपचा आनंदोत्सव
पुणे : पिंपरी पालिकेत मानधनावरील शिक्षक भरतीसाठी ८५० जणांचे अर्ज
पुणे: सदस्यपदासाठी ३०३३,तर सरपंचपदासाठी ५६० उमेदवार; जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक
Viral Video: संकटात असलेल्या दाम्पत्याच्या मदतीसाठी सारे आले धावून; नेटकरी म्हणाले, ‘हा खरा भारत…’