अदना (तुर्कस्तान) : तुर्कस्तानचा पूर्व भाग व लगतच्या सीरियात सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सहा  हजारांपेक्षा जास्त झाली आहे. कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मंगळवारी बचावकार्य पथकांचे प्रयत्न सुरू होते. बचाव मोहिमेदरम्यान आणखी  मृतदेह सापडल्याने भूकंपबळींची संख्या ६,२०० झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील देशांनी येथे बचावकार्यासाठी पथके पाठवली. तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले, की आपत्कालीन बचाव पथकांचे २४ हजार ४०० हून अधिक कर्मचारी शोध व बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत. परंतु एकटय़ा तुर्कस्तानमध्येच सहा हजारांपेक्षा जास्त इमारती कोसळल्यामुळे बचाव पथके अपुरी पडत आहेत. येथे गोठणिबदूखाली असलेले प्रतिकूल तापमान व सुमारे २०० भूकंपोत्तर धक्क्यांमुळे (आफ्टरशॉक) मदतकार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत आहे. या खिळखिळय़ा झालेल्या इमारतींच्या अवशेषात भूकंपाचे धक्के बसत असताना शोधकार्य राबवणे जोखमीचे व धोकादायक बनले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake victims over five thousand rescue operations ysh
First published on: 08-02-2023 at 00:05 IST