अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज मतदान * ओबामा-रोम्नी फिफ्टी फिफ्टी
जगाची महासत्ता असे बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेचा अधिपती कोण, याचा फैसला करणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज, मंगळवारी पार पडत आहे. चार वर्षांपूर्वी ‘यस वुई कॅन’चा नारा देत अध्यक्षपदावर आरूढ झालेले बराक ओबामा आणि त्यांच्या ‘मवाळ’ धोरणांना आक्रमक विरोध करत उभे ठाकलेले मिट रोम्नी यांचे पारडे समसमान आहे. गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या या वाग्युद्धाला सोमवारी मध्यरात्री पूर्णविराम मिळाला. मतदानपूर्व चाचण्यांत दोघांनाही ४९-४९ टक्के मते मिळाल्याने विजयाचा लंबक कोणाकडे झुकेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, ओबामा पराभूत झाले तर फेरनिवडणुकीत हरणारे अमेरिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासातील ते केवळ चौथे राष्ट्राध्यक्ष ठरतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election today in america