काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने मोठी मोहिम उघडली आहे. सध्या उत्तर काश्मीरच्या सोपोरमधील हार्दशिवा गावामध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दोन ते तीन दहशतवादी अडकले आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून हार्डशिवा गावामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी या परिसराला घेराव घालून शोधमोहिम सुरु केली. दहशतवादी आणि जवानांमध्ये सध्या इथे चकमक सुरु आहे.

नारबालमधून पाच जणांना अटक
दरम्यान बडगाम पोलीस आणि लष्कराच्या दोन राष्ट्रीय रायफल्सने नारबाला भागातून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. एके ४७ च्या गोळया, मॅगझीन आणि लष्कर-ए-तोयबाचे २० पोस्टर्स त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.