Ex-Microsoft India executive sues company : मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी लतिका पै यांनी कंपनी विरोधात दिवाणी खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की, कामाच्या ठिकाणचे वातावरण प्रतिकूल असल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. तसेच त्यांनी या प्रकरणात नुकसान भरपाई म्हणून ३५.३ कोटींची मागणी केली आहे.

या खटल्यात पै यांनी त्यांना ‘प्रोसिजरल अनफेअरनेस’चा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे, ज्याला त्यांनी ‘कन्स्ट्रक्टिव्ह डिसमीसल’ असे म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची ७ मे रोजी सुनावणी झाली, त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या वकिलांनी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला आव्हान दिल्यानंतर हे प्रकरण बंगळुरू शहर दिवाणी न्यायालयात स्थलांतरित करण्यात आले. आथा या प्रकरणावर ९ जून रोजी बंगळुरू येथे सुनावणी होणार आहे.

स्टार्टअप इकोसिस्टीमधी दिग्गज असलेली ही कंपनी महिलांच्या नेतृत्वाखालील व्हेंचर्सना पाठिंबा देण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीमध्ये पै या मायक्रोसॉफ्टमध्ये व्हेंचर कॅपिटल अँड प्रायव्हेच इक्विटी पार्टनरशीपच्या कंट्री हेड होत्या. पण त्यांनी जुलै २०२४ मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

पै यांनी दावा केला की त्यांनी नेतृत्व केलेल्या ‘हायवे टू अ १०० यूनिकॉर्न या फ्लॅगशिप स्टार्टअप’ या उपक्रमाच्या विभागाअंतर्गत चौकशीनंतर त्यांना आठ महिने धमकावणे आणि प्रोफेशनल आयसोलेशनचा सामना करावा लागला. मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्ये राज्य सरकारच्या मदतीने लहान शहरातील स्टर्टअप्सना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला होता.

२०१९ मध्ये नंतर मायक्रोसॉफ्टकडे निनावी पद्धतीने या उपक्रमादरम्यान ‘व्हेंडर फेवरिझम’ आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले. पण या आरोपांनंतर झालेल्या चौकशीत पै यांच्याविरोधात काहीही चुकीचे आढळून आले नाही आणि त्यांना २०२१ मध्ये बढती देण्यात आली.

मात्र मार्च २०२४ मध्ये लॉ फर्म मॉर्गन लुईस अँड बोकिअस यांनी दुसरी चौकशी सुरू केली. पै यांनी दावा केला की, त्यांना पहिल्या चौकशीच्या मूळ तक्रारी आणि ट्रान्सक्रिप्ट्स नाकारण्यात आल्या, आणि २०२४ मध्ये एक महत्त्वाची मुलाखत मायक्रोसॉफ्टच्या धोरणांचे उल्लंघन करून रेकॉर्डिंगशिवाय घेण्यात आली. त्यांनी या सर्व गोष्टींवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना आणखीनच कंपनीच्या विरोधाला सामोरे जावे लागले, असेही पै यांनी सांगितले. पुढे त्यांना महत्त्वाच्या फोरममधून हटवण्यात आले आणि त्यांना ‘ट्रबलमेकर’ असे लेबल लावण्यात आले. तसेच २०२० च्या सायबरबुलिंग प्रकरणात मायक्रोसॉफ्टने अपुरी कारवाई केल्याचा आरोप देखील पै यांनी केला आहे.