युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात शांततेचा संदेश देण्यासाठी केलेली विनंती फिफाच्या आयोजकांनी फेटाळली आहे. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, कतार येथे खेळवल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात झेलेन्स्की व्हिडीओच्या माध्यमातून फुटबॉल चाहत्यांना शांततेचा संदेश देऊ इच्छित होते. पण फिफाकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, यासंबंधी अद्यापही युक्रेन आणि फिफामध्ये चर्चा सुरु असल्याचंही वृत्त सीएनएनने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशियाने युद्ध पुकारल्यापासून झेलेन्स्की यांनी वारंवार शांततेचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तसंच मंचाची मदत घेतली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, इस्त्रायल संसद, ग्रॅमी पुरस्कार, कान्स फिल्म फेस्टिव्हल, जी-२० परिषद अशा अनेक माध्यमातून झेलेन्स्की यांनी जगाला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय त्यांनी मुलाखतींच्या माध्यमातूनही हा प्रयत्न केला आहे.

FIFA World Cup Final 2022: मेसीची स्वप्नपूर्ती की फ्रान्सची पुनरावृत्ती? विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना आज

दरम्यान, युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर फिफाने रशियाच्या संघावर बंदी घातली होती. गेल्या काही आठवड्यात रशियाने युक्रेनवर मिसाईल हल्ले केले असून त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. थंडीचा काळ असल्याने रशिया ऊर्जेच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे.

रशियाच्या लष्कराने नोव्हेंबरमध्ये युक्रेनमधील झॉपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर तोफांचे हल्ले चढवले होते. यापैकी किमान बारा वेळा या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा युक्रेनची अणुऊर्जा कंपनी एनर्गोअॅटमने केला. हल्ल्यात ज्या सुविधांचे नुकसान झाले आहे, ते पाहता या प्रकल्पाचे युनिट पाच आणि सहा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांनाच लक्ष्य केले गेल्याचे स्पष्ट होत आहे. हे युनिट सुरू झाल्यास युक्रेनला आवश्यक तो वीजपुरवठा करणे शक्य होणार होते अशी माहिती कंपनीने दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football world cup 2022 fifa rejects ukraine president zelensky request for peace message sgy