नौदलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा यांना सोमवारी हृदय विकाराचा झटका आला. त्यांना उपचारांसाठी नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदल प्रमुखपदी नियुक्ती न झाल्याने नाराज झालेल्या सिन्हा यांनी मागील आठवडय़ात स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.
संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल रॉबिन
धोवन यांच्या सूचनांप्रमाणे सिन्हा
यांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर लवकरच हृदय शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.