पुरूषांचा वॉलीबॉल सामना बघण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून तुरूंगात डांबण्यात आलेल्या गोन्चे गवामी या ब्रिटिश-इराणी महिलेची जामीनावर सुटका करण्याची आल्याचे समजते. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्वस्थ असल्याच्या कारणावरून तिला जामीन देण्यात आला आहे. गोन्चे गवामी हिला पुरूषांचा वॉलीबॉल सामना पाहण्यासाठी प्रयत्न केल्याच्या कारणावरून एका वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. इराणी हुकूमतीच्या विरोधात मुद्दाम षडयंत्र रचल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. इस्लामी रिपब्लिकच्या नियमांनुसार तेथील महिलांना पुरूषांचा खेळ पाहण्यास सक्त मनाई आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2014 रोजी प्रकाशित
वॉलीबॉलचा सामना बघितल्याने अटक झालेल्या इराणी महिलेला जामीन
पुरूषांचा वॉलीबॉल सामना बघण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून तुरूंगात डांबण्यात आलेल्या गोन्चे गवामी या ब्रिटिश-इराणी महिलेची जामीनावर सुटका करण्याची आल्याचे समजते.
First published on: 24-11-2014 at 07:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghoncheh ghavami for attending a mens volleyball game in iran has been released on bail