Suicide in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) मेन २०२५ मध्ये कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या १२ वीच्या एका विद्यार्थीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या आधी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आधी पालकांची माफी मागितली त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या जेईई मेन्सचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. १८ वर्षीय या विद्यार्थिनीने गोरखपूरमधील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. पण सतत येणाऱ्या कमी गुणांमुळे ती निराश झाली होती. या निराशेला तोंड देता येऊ न शकल्याने तिने बुधवारी आत्महत्या केली, असा दावा पालकांनी केला आहे.

दरम्यान, तिच्या खोलीत सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये तिने लिहिलंय की, आई आणि बाबा मला माफ करा. तुमची इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. आपला एकत्र प्रवास इथेच संपतो आहे. आता रडू नका. तुम्ही दोघांनी मला अपार प्रेम दिले. पण मी तुमची स्वप्ने पूर्ण करू शकले नाही.” अशी खंत तिने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे.

संबंधित तरूणी दोन दिवसांपूर्वी घरातून हॉस्टेलमध्ये गेली होती. बुधवारी सकाळी ती तिच्या वडिलांशी बोललीही आणि मोबाईल फोनही रिचार्ज केला. ती नैराश्येत असल्याने तिने तिच्या रिझल्टविषयी कोणाशी बोलू नये असा सल्ला तिच्या वडिलांनी दिला. तिच्या वडिलांनी तिला धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. तसंच, पुढच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी प्रोत्साहितही केलं. पण तरीही त्यांची मुलगी इतक्या टोकाचा निर्णय घेईल, याची कल्पनाही नव्हती असं तिच्या वडिलांनी म्हटलंय.

हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह

बुधवारी ही मुलगी बराच वेळ तिच्या हॉस्टेलच्या खोलीत बंद होती. तिने बराचवेळ हॉस्टेलची खोली उघडली नाही तेव्हा तिच्या मैत्रिणींनी हॉस्टेल वॉर्डनला याबाबत कळवले. पोलिसांच्या मदतीने अखेर दार उघडले तेव्हा ती पांढऱ्या स्कार्फमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली. जेव्हा किशोरीने बराच वेळ हॉस्टेलची खोली उघडली नाही, तेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी हॉस्टेल वॉर्डनला कळवले. पोलिसांच्या मदतीने अखेर दार उघडण्यात आले, ज्यामध्ये १८ वर्षीय विद्यार्थिनी पांढऱ्या स्कार्फच्या फाशीला लटकलेली आढळली. खोलीत सुसाईड नोट देखील सापडली.

पोलिसांनी मुलीच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. एसपी सिटी अभिनव त्यागी यांनी पुष्टी केली की अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl died by suicide in uttar pradesh by leaving suicide note sgk