गोव्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय मॅनेजरनं आपल्या पत्नीला समुद्रात बुडवून खून केला. पत्नीचा बुडून मृत्यू झाला, असं दाखवण्याचा प्रयत्न मॅनेजरनं केला. पण, एका व्यक्तीनं या घटनेचा व्हिडीओ चित्रित केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव कटियार असं आरोपीचं नाव आहे. तर, दीक्षा गंगवार ( २७ वर्षीय ) असं मृत महिलेचं नाव आहे. गौरव आणि दीक्षाचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण, गौरवचे विवाहबाह्य संबंध होते. यातूनच त्यानं दीक्षाचा खून केल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्यानं म्हटलं, शुक्रवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास गौरव आपल्या पत्नीला काबो डी रामा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला घेऊन गेला. तिथे खडकाळ भागात गेल्यावर गौरवने दीक्षाला समुद्रात बुडवलं. यानंतर दीक्षाचा बुडून मृत्यू झाल्याचा बनाव गौरवने केला. ही घटना समोर आल्यानंतर तातडीनं कुंकोलीम ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पोलिसांनी दीक्षाच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. मात्र, एका स्थानिक व्यक्तीनं या घटनेचा व्हिडीओ चित्रित केल्यानं गौवरचं बिंग फुटलं.

व्हिडीओत काय?

पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, चित्रित केलेल्या व्हिडीओत गौरव समुद्रातून बाहेर येतो. परत पुन्हा समुद्रात जाऊन दीक्षाचा मृत्यू झाला की नाही याची खात्री करतो. त्यानंतर दीक्षा बुडून मृत्यू झाल्याचं बनाव रचतो. ‘फ्री प्रेस जर्नल’ने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa hotel manager drowns wife cabo de rama beach tries to partray as accident ssa