“महिला बॉसशी लैंगिक संबंध ठेवायला… “, गुगलच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

एका माजी अधिकाऱ्यांने गूगलच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

google
संग्रहित फोटो

मागील काही दिवसांपासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी गूगल विविध कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या कंपनीने अलीकडेच हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. चुकीच्या पद्धतीने नोकरकपात केल्याने गुगलच्या अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, एका माजी अधिकाऱ्यांने गूगलच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. कार्यलयाच्या डिनर पार्टीत महिला अधिकाऱ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याला नोकरीवरून काढलं, असा खळबळजनक दावा गुगलच्या माजी अधिकाऱ्याने केला. याबाबतचं वृत्त ‘इनशॉर्ट’ने दिलं आहे.

हेही वाचा- Google Layoffs: Google ने कामावरून काढून टाकताच महिला झाली भावूक; म्हणाली, “बॉसला फोन केला अन्…”

संबंधित माजी अधिकाऱ्याने दावा केला की, गूगल कंपनीतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने दिलेली लैंगिक सुखाची ऑफर नाकारल्याने आपल्याला नोकरीवरून काढलं. कार्यालयाच्या डिनर पार्टीच्या दिवशी हा प्रकार घडला. त्याने आरोप केला की, डिनर पार्टीच्या दिवशी त्याच्या महिला बॉसने त्याला पकडलं. “तुला आशियाई स्त्रिया आवडतात, हे मला माहीत आहे,” असं म्हणत तिने लैंगिक संबंधासाठी विचारणा केली. पण वरिष्ठ महिला अधिकाऱ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास आपण नकार दिला. यामुळे आपल्याला नोकरीवरून काढलं, असा आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला. संबंधित कनिष्ठ पुरुष अधिकारी मागील १६ वर्षांपासून Google कंपनीत काम करत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:08 IST
Next Story
Video: कॅमेऱ्याची फिकीर कुणाला? देशाभिमानच सर्वोच्च! राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीत सुरू होताच युवक…!
Exit mobile version